लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानी छापे टाकण्यात आले असून, या ठिकाणी तीन ते चार कोटी रुपयांची रक्कम आढळली असून, पैसे मोजण्याची मशिनच पोलीस अधिकाऱ्यांनी मागविली आहे.

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Mumbai, Fire Breaks Out, Government Building bandra, Fire Government Building bandra, bandra news, fire news, fire in bandra, mumbai news, marathi news, fire brigade, firefighters,
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

रामोड हे मुळचे नांदेड येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात अरिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर काम पहात आहेत. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.