साऱ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने रविवारी पाच वाजता प्रवेश केला. त्या वेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केल्याने सारा परिसर सोन्यासारखा पिवळाधमक झाला अन् माउलींची पालखी भंडाऱ्यात न्हाली. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी करीत असलेला विठूनामाचा गजर व खंडोबाभक्तांचा ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ या जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले.
बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सायंकाळी जेजुरी नगरीत प्रवेश केला. खंडोबाचा ऐतिहासिक गड लांबूनच दिसू लागल्यावर वारकरी बांधवांच्या खंडोबा भक्तीप्रेमाला उधाण आले. मल्हारी वारी व खंडोबाची पारंपरिक गीते म्हणताना वारकरी नाचत होते . पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जेजुरीच्या नगराध्यक्षा सुरेखा सोनवणे, उपनगराध्यक्ष संपत जगताप, प्रांत समीर शिंगटे , तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, मुख्याधिकारी समीर भुमकर, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अ‍ॅड. दशरथ घोरपडे, विश्वस्त डॉ.प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, अ‍ॅड. वसंत नाझीरकर, अ‍ॅड.किशोर म्हस्के आदी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता पालखी तळावर पोहोचली.
पंढरीत आहे रखुमाबाई , येथे म्हाळसा-बाणाई,
तिथे विटेवरी उभा , येथे घोड्यावरी शोभा,
तिथे बुक्याचे रे लेणे , येथे भंडार भुषणे
अशी गाणी म्हणत महिला भक्तांनी एकमेकींना भंडार व बुक्का लावीत फुगड्या खेळल्या. ज्या भाविकांना गड चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी देवस्थानतर्फे पालखीमार्गावर भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सासवड-जेजुरी रस्ता रुंदीकरणामुळे मोठा झाल्याने वारकऱ्यांना चालणे सोपे झाले. सोमवारी (४ जून) जेजुरीत येथे सोमवती यात्रा आहे. या यात्रेनिमित्ताने खंडोबा देवाची पालखी गडावरुन कऱ्हा स्नानासाठी सकाळी अकरा वाजता निघणार आहे .गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शासनाच्या निर्मलवारी अभियानांतर्गत पाचशे शौचालये उभारल्याने वारकऱ्यांची चांगली सोय झाली.

पालखी तळावर चिखलाचे साम्राज्य
रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पालखी तळावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. समाज आरतीसाठीही व्यवस्थित जागा उपलब्ध नव्हती. प्रांत समीर िशगटे, तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी तातडीने पालखी तळाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. या परिसरात शंभर ब्रास खडी पसरण्यात आली. दीडशे मजुरांनी जेसीबी मशीन, ट्रॅक्टर आदींच्या साहाय्याने युध्द पातळीवर काम करुन पालखी तळाच्या जागा नीट करण्यात आली.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी