डॉ. आनंद नाडकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार 

दरवर्षी लोकजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो.

पुणे : अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला असून १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. नाडकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी डॉ. नाडकर्णी देत असलेल्या अव्याहत योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे  दरवर्षी लोकजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. ५१ हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १४ नोव्हेंबरला होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. नाडकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doctor anant bhalerao smriti award to anand nadkarni akp