पिंपरी-चिंचवडमध्ये एका डॉक्टर महिलेने एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला आपण आत्महत्या करत असल्याचे मेसेज करुन सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती. तणावाखाली असलेल्या या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखल्याने मोठा प्रसंग टळला आहे.

या महिलेचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून खोडासळपणा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कॉलगर्ल या नावाने डॉक्टर महिलेचा फोटो एका वेबसाईटर टाकण्यात आला होता. कॉलगर्ल असे सर्च केले असता संबंधित महिला डॉक्टरचा फोटो आणि मोबाईल क्रमांक येत आहे. अनेक जण त्यांना फोन करत असल्याचेही आता समोर आले आहे. त्यानंतर या महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व प्रकारामुळे ही महिला तणावात होती. त्यामुळे तीने शनिवारी दुपारी अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तातडीने जाऊन डॉक्टर महिलेची समजूत काढली आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर हा कॉलगर्ल म्हणून एका वेबसाईटवर टाकण्यात आला आहे.  कॉलगर्ल असे गूगलवर सर्च करताच संबंधित महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर येतो असे पोलिसांनी सांगितले. अनेकदा या महिलेला त्याबाबत अनेक फोन देखील आले आहेत. यामुळे ही महिला तणावात होती. त्यामुळे तिने आज दुपारच्या सुमारास आत्महत्या करत असल्याचा मेसेज पोलीस अधिकाऱ्यांना केला होता. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे आणि महिला पोलीस अधिकारी कविता रुपनर यांना देण्यात आली. दोघांनी तातडीने घटनास्थळी जाऊन डॉक्टर महिलेची दोन तास समजूत काढली अन आत्महत्या या पर्याय नसल्याचं सांगत आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

या महिलेने सायबर पोलिसात यासंबंधी तक्रार दिली असून कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो मोबाईल नंबर आणि फोटो काढण्यासाठी पत्र देण्यात आलं आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.