scorecardresearch

पुणे: नरपतगिरी चौकातील मंदिरातून दानपेटी चोरीला

मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी दानपेटी चोरुन नेली.

thieves
श्री साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना उघडकीस आली (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत दिलीप बहिरट (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे मंदिर आहे.

श्री रामनवमीनिमित्त मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी दानपेटी चोरुन नेली. दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या