राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सूचना

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भारतीय जनता पक्षाबरोबर युती करावी, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी घेतली असली, तरी युतीबाबत तूर्त चर्चा नको, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना के ली.

आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असेल, तर महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करावी, अशी मागणी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी के ली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकी दरम्यान, युतीबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. मात्र सध्या या बाबत चर्चा नको, अशी सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना  के ली.

सन २००७ च्या निवडणुकीत मनसेला आठ जागा मिळाल्या होत्या.२०१२ च्या निवडणुकीत पक्षाचे २९ उमदेवार विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा घेत मनसे महापालिके तील प्रमुख विरोधी पक्ष ठरला. मात्र त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत पक्षाला के वळ २ जागांवर समाधान मानावे लागले. चार सदस्यीय प्रभाग या पद्धतीने गेल्या निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला, अशी भावना मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. तीन किं वा चार नगरसेवकांचा प्रभाग असेल तर पक्षाची ताकद कमी पडते. मनसेला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. अशा परिस्थितीत भाजपबरोबर युती के ल्यास मनसेलाही फायदा होऊन पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शके ल. कसबा, कोथरूड आणि हडपसर तसेच मध्यवर्ती भागात मोठा फायदा होईल, अशी अटकळ युतीच्या प्रस्तावासाठी मांडण्यात आली आहे.