पुण्यात गुरुवारी एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख  माजी मंत्री म्हणून करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भाजपा सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार असा प्रश्नही सर्वांनाच पडला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पुण्यात देहूगाव येथे एका खासगी दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी चंद्रकांत पाटील आले होते तेव्हा त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’

देहूगाव येथे एका खासगी दुकानाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होते. उद्घाटन करण्याच्या अगोदर सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचं म्हटलं, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या सूचक विधानाचा नेमका अर्थ काय आहे हे येणाऱ्या दोन-तीन दिवसात कळेल. तसेच विरोधक देखील त्यांच्या सूचक विधानाकडे कसे पाहतात हे देखील पाहावं लागणार आहे.

भाजपा संभाजी ब्रिगेडसोबत युतीसाठी तयार?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात आणखी काही वेगळं समीकरण पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.