पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीवरून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले असतानाच डॉ. कोल्हे यांनी पवार यांना डिवचले आहे. मंचर येथील पोलीस अधिका-यांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत वेळ नसल्याने दाखवून देत ‘ घड्याळ बंद पडले का ?’ अशी विचारणा कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर पोलीस बांधवांसाठी ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ‘ तुतारी’ फुंकण्यास विसरू नका, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे शासकीय निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये हा कार्यक्रम कधी होणार, याचा उल्लेख नाही. हा संदर्भ घेत डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांना डिवचले आहे.

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात
Bhavana Gawlis candidature was rejected in Yavatmal-Washim Lok Sabha Constituency
भावना गवळींना उमेदवारी नाकारली; पण, स्वत: मुख्यमंत्री यवतमाळात येत असल्याने शेवटच्या क्षणी…

हेही वाचा…पुणे : पुरंदरमध्ये पुन्हा अफूची शेती; कांदा, लसणाच्या पिकात अफूची झाडे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर डॉ. कोल्हे अजित पवार यांना पाठिंबा देतील, अशी चर्चा होती. मात्र कोल्हे यांनी शरद पवार यांच्या समवेत कायम राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार आणि कोल्हे यांच्यात वादाला सुरूवात झाली. यावेळी शिरूर मधून कोल्हे कसे निवडून येतील, हे पहातो अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर या दोघात शाब्दिक युद्ध सुरू झाले असून कोल्हे यांना पवार यांना चिमटा घेतला आहे.

हेही वाचा…नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून शाळकरी मुलाचा मृत्यू; अपघातात दुचाकीस्वारासह महिला जखमी

निमंत्रण मिळाले. मात्र, निमंत्रण पत्रिकेत ‘वेळ’च लिहिली नाही. ‘घड्याळ’ बंद पडले की काय अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून दिली आहे. तसेच पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागत ‘तुतारी’ वाजवून करायला विसरू नका! असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.