कचरा वेचकांना अगोदरच करोनाने मारलं आणि आता महापालिका मारत आहे. या दुहेरी संकटात कचरा वेचक सापडला आहे. खासगी कंत्राटदार आणायचे नाटक कशासाठी?, आम्ही काय पाप केले आहे. असा सवाल जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला आहे. मी या वयातही गप्प बसणार नाही. कचरावेचकांसाठी रस्त्यावर उतरून सत्याग्रह करणार आणि वेळ पडल्यास तुरुंगातही जाईन असा इशारा आढाव यांनी यावेळी दिला.

स्वच्छ संस्थेचे काम खासगी कंत्राटदाराला देण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. या नियोजनाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचक महिलांनी आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी हे देखील सहभागी झाले होते. करोना काळात कचरा वेचकांनी काम केले. त्याबद्दल त्यांची दखल तर घेतली नाहीच. उलट आता त्यांचे काम खासगी कंत्राटदाराला देण्याचे नियोजन सुरू आहे. ही निषेधार्थ बाब असल्याची भूमिका त्यांनी यावेळी आढाव यांनी मांडली.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

नक्की वाचा >> पुणे महानगरपालिकेला दिलेले २०० कोटी कुठे गेले?; ED, CBI चौकशी करा : सुप्रिया सुळे

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका वर्षाला २०० कोटी खर्च करते. पण कचरा डेपोतील परिस्थिती पाहता, तिथे काहीच केले नसल्याचे दिसून आले आहे. आता ज्या महिला शहरातील कचरा प्रत्येकाच्या घरी जाऊन घेतात. त्यांचे काम काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब निषेधार्थ असून आम्ही असं होऊ देणार नाही. या सर्व महिलांच्या पाठीशी आहोत आणि न्याय मिळून देऊन अशी भूमिका यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांडली.

सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून महिलांचे आंदोलन

करोना आजाराचे रुग्ण वाढत असताना. राज्यभरात राजकीय पक्षाकडून आंदोलन सुरू आहेत. मात्र त्यावेळी राजकीय पक्षाकडून कुठे ही सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना दिसले नाही. मात्र आज महापालिकेच्या प्रवेशद्वार ‘स्वच्छ’च्या महिलेने आंदोलन केले त्यात त्यांनी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केल्याचं दिसून आलं.