पुणे : प्रतिष्ठित गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरुपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची निवड झाली आहे. डॉ. राजस परचुरे यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपल्याने नव्या कुलगुरूंची निवड करण्यात आली. डॉ. अजित रानडे गेली अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. आयआयटी बॉम्बेतून बीटेकची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमध्येही शिक्षण घेतले. त्यानंतर ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी संपादन केली. आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थसल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. तर रिझर्व बँक, फिक्की, सीआयआय अशा संस्थांच्या विविध समित्यांवर काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (आयसीआरआयईआर), इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रीसर्च (आयजीआयडीआर) या संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे. आयआयटी बॉम्बेच्या नियामक मंडळाचे ते सदस्य आहेत. तसेच ‘लोकसत्ता’सह विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी अर्थविषयक लेखनही केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr gokhale organization vice chancellor ajit ranade
First published on: 19-01-2022 at 01:30 IST