scorecardresearch

डॉ. प्राची मेहता यांच्या संशोधन कार्याचा गौरव

वन्यजीव संशोधन आणि संवर्धन परिषदेच्या शास्त्रज्ञ डॉ. प्राची मेहता यांना घुबडांबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय घुबड केंद्राकडून गौरवण्यात आले आहे.

पुणे : वन्यजीव संशोधन आणि संवर्धन परिषदेच्या शास्त्रज्ञ डॉ. प्राची मेहता यांना घुबडांबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय घुबड केंद्राकडून गौरवण्यात आले आहे. ‘आऊल हॉल ऑफ फेम’ असे या पुरस्काराचे नाव आहे. डॉ. मेहता या रान िपगळा (फॉरेस्ट ऑऊलेट) या घुबडांच्या प्रकारावर संशोधन करत असून  नामशेष समजल्या जाणाऱ्या या घुबड प्रकारातील पक्षी आढळल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

रानिपगळा हे केवळ भारतात आढळणारे एक दुर्मिळ प्रकारातील घुबड आहे. १८८४ मध्ये एफ. आर. ब्लेविट या ब्रिटिश अधिकाऱ्याने ओरिसामध्ये या घुबडाचा शोध लावला. त्यानंतर दीर्घकाळापर्यंत ते न आढळल्याने ते नामशेष झाल्याचे मानण्यात आले. घुबड हा निशाचर पक्षी समजला जातो. रानिपगळा ही घुबडाची जात दिवसा सक्रिय राहणारी आणि लहान जात आहे. मध्य भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात तब्बल १२ ठिकाणी या प्रजातीचे वास्तव्य आहे.

महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नंदुरबार, नाशिक आणि तानसा अभयारण्यात रानिपगळा आढळतो. डॉ. प्राची मेहता यांच्या नेतृत्वाखाली २००५ पासून वाइल्डलाइफ रिसर्च अ‍ॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीकडून रानिपगळय़ांवर संशोधन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात २००५-२००८ या काळात ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्याआंतर्गत मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात रानिपगळय़ांचे अस्तित्व असलेली दोन नवी ठिकाणे शोधण्यात यश आले. डॉ. मेहता यांनी प्रथमच घुबडांबाबत संशोधनात अद्ययावत तंत्रांचा वापर केला. डॉ. मेहता यांच्या या योगदानासाठी वल्र्ड आऊल हॉल ऑफ फेम २०२२ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr prachi mehta research work scientist ysh

ताज्या बातम्या