पुणे : डॉ. प्रकाश आमटे कर्करोग उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

dr prakash amte
डॅा. प्रकाश आमटे ( संग्रहित छायचित्र )

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इतर संसर्गांचा धोका टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीना भेटीसाठी न येण्याचे आवाहन रुग्णालय आणि कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी पुण्यात आले असता डॉ. आमटे यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता त्यांना न्युमोनिया आणि ल्युकेमियाची सुरुवात असल्याचे निदान झाले. न्युमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ. आमटे यांचे पुत्र अनिकेत यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली असून प्रकृतीतील सुधारणेबाबतही वेळोवेळी समाज माध्यमातून माहिती दिली जाईल असे कळवले आहे. दरम्यान डॉ.आमटे यांची प्रकृती चांगली असून चिंतेचे कारण नसल्याचे आमटे यांच्या निकटवर्तीयांकडून कळवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr prakash amte once again admitted in deenanath mangeshkar hospital for cancer treatment pune print news amy

Next Story
महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान ; शिवाजीराव आढळराव यांचा आरोप, अजित पवार यांच्याकडे रोख
फोटो गॅलरी