जागतिक दर्जाचे संशोधक घडवण्याचे उद्दिष्ट

नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती

डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन, नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती

‘गणित, तत्त्वज्ञान, योग विज्ञान, भाषा विज्ञान या विषयातील ज्ञानाचा परंपरागत ठेवा भारताकडे आहे. ही परंपरा जपत जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून देणे, जागतिक दर्जाचे संशोधक घडवणे,’ असे उद्दिष्ट ठेवून नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी काम करणार असल्याचे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. डॉ. भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलपतीपद सोडले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन हंगामी कुलगुरू व्हीसी गोपा सभरवाल यांना मुदतवाढ न देण्याच्या निर्णयावरून यिओ यांनी हे पद सोडले होते. यापूर्वी २०१५ मध्ये मोदी सरकारने नालंदा विद्यपीठाचे कुलपती अमर्त्य सेन यांच्या पदाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. या विद्यापीठाच्या कुलपतीपदावर डॉ. भटकर यांची नियुक्ती राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी डॉ. भटकर हे या पदावर काम करणार आहेत. पुढील आठवडय़ात ते पदभार स्वीकारतील. ‘नालंदा विद्यापीठाला मोठी परंपरा आहे. जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून लौकिक राहावा आणि जागतिक दर्जाचे संशोधन विद्यापीठातून व्हावे हा माझा उद्देश आहे,’ असे डॉ. भटकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr vijay bhatkar comment on world class researchers

ताज्या बातम्या