नाटक-रंगभूमी परिभाषा हा संग्रह संशोधनातील विद्वत्तेचे प्रतीक

दोन दशकांच्या दीर्घकालीन संशोधनातून डॉ. विलास खोले यांनी तयार केलेला नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह हा ग्रंथ संशोधनातील विद्वत्तेचे प्रतीक असून नाटय़ अभ्यासकाला पुढे नेणारा ग्रंथ आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या कार्यक्रमात डॉ जब्बार पटेल यांचे मत   

पुणे :  दोन दशकांच्या दीर्घकालीन संशोधनातून डॉ. विलास खोले यांनी तयार केलेला नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह हा ग्रंथ संशोधनातील विद्वत्तेचे प्रतीक असून नाटय़ अभ्यासकाला पुढे नेणारा ग्रंथ आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते डॉ. विलास खोले यांच्या नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह या ग्रंथाला ज्येष्ठ नाटय़ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे पुरस्कृत इंदिरा भालचंद्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी पटेल बोलत होते. डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या कन्या विशाखा पंडित, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विजय खोले, संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह सुवर्णा दिवेकर, अरिवद रानडे, बाळासाहेब देशमुख, डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. गायत्री सावंत या वेळी उपस्थित होत्या. 

डॉ. खोले म्हणाले, नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह या ग्रंथ निर्मितीमागे प्रा. स. शि. भावे यांची प्रेरणा होती. ग्रंथाच्या भारतातील आणि युरोप-अमेरिकेतील ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथाचा शोध आणि वाचन करण्याचे काम आठ वर्षे केले.

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते डॉ. विलास खोले यांना ‘इंदिरा भालचंद्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मधुमिलिंद मेहेंदळे आणि विशाखा पंडित या वेळी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drama theater definition symbol scholarship research ysh

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या