पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि दुष्काळामुळे लागू केलेली शुल्कमाफी यात फरक आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घ्यायचेच नाही, असे स्पष्टीकरण उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले. तसेच व्यावसायिक महाविद्यालयांनी शिक्षण शुल्काव्यतिरिक्त एक रुपयाही अधिकचा आकारल्यास संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी दिला.

उच्च शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. देवळाणकर, डॉ. नाईक यांनी या बाबत माहिती दिली. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील महाविद्यालयांमधील पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर कृती समित्या नेमण्यात आल्या आहे. या समित्यांच्या कामाचा उच्च शिक्षण संचालनालयाकडून दर पंधरा दिवसांनी घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, परीक्षा शुल्कमाफी आणि अन्य मदतीसाठी विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले.

डीटीईच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाही परीक्षा शुल्क माफीचा निर्णय लागू आहे. या महाविद्यालयांच्या प्रशासनाने एफआरएने मंजूर केलेल्या शिक्षण शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे अधिक रक्कम आकारल्यास कारवाई करण्यात येईल. महाविद्यालयाचे नावानीशी विद्यार्थी डीटीईकडे तक्रार नोंदवू शकतात, असे डॉ. नाईक यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठनिहाय संपर्क क्रमांक

मुंबई विद्यापीठ, मुंबई

डॉ. पूजा रौंदळे – ९३२२०२०५८९

लीलाधर बनसोड – ९८३३९६९९७७


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

डॉ. राजेंद्र तलवारे – ९८९०६४२४३१

डॉ. सविता कुलकर्णी – ७७२००३६७७४, अजय ठुबे – ७५८८१६९१३४
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</p>

डॉ. अजितसिंग एन. जाधव – ९५४५५९५९९९
अलोक जत्राटकर – ९६९८९२८०८०

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

डॉ. अंधारे – ९९७५०५५१५५
डॉ. कळवाणे – ७०२०६३४५०२

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई

संजय नरेकर – ९९२२४४४४६७
डॉ. अंकुश चव्हाण – ९६८९६७२५०९

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

डॉ. भटूप्रसाद पाटील – ७७९८९२५४८५

महेंद्र बनसोडे – ९७६६०५९०७६

संचालनालयाच्या स्तरावर कक्ष स्थापन

शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या स्तरावर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या अध्यक्षतेखालील या कक्षात वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, बाबूरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, सिम्बासोसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज देवणे यांचा समावेश आहे.