चंदननगर भागात अफू विक्री करणाऱ्या एकास चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा किलो अफूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला. महिराम मनाराम बिष्णोई (वय २८, रा. चंद्रभागा बिल्डींग, चंदननगर, मूळ रा. लोआवट, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने बिष्णोईला शुक्रवारपर्यंत (२८ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बिष्णोई अफूच्या बोंडापासून तयार करण्यात आलेल्या चुऱ्याची विक्री करत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली.

हेही वाचा :महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; राज्य सरकारचे आदेश

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

पोलिसांनी बिष्णोई याच्या घरात छापा टाकला. त्याच्या घरातून सहा किलो अफूच्या बोेंडापासून तयार करण्यात आलेला चुरा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोेंडांच्या चुऱ्याची किंमत ६० हजार रुपये आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे, उपनिरीक्षक मुळूक, पोलीस हवालदार अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, विकास कदम, शेखर शिंदे, गणेश हांडगर, अनुप सांगळे आदींनी ही कारवाई केली.