लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
81 Bangladeshi nationals arrested from Mumbai news
मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट

अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रीतम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी अरुण अरोरा याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. अरोरा याच्याकडून दोन किलो १४० ग्रॅम चरस, एक किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ४३ लाख ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आणखी वाचा-हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

अरोराने अमली पदार्थ कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.

Story img Loader