लोणावळा : लोणावळा ते पवनानगर दरम्यान जवळचा रस्ता असलेल्या दुधिवरे खिडींचा वापर ग्रामस्थांसह पर्यटक मोठय़ा प्रमाणावर करतात. दुधिवरे खिंडीतील रस्ता धोकादायक झाला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच खड्डय़ातील खडी बाहेर पडल्याने या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार वर्षांपूर्वी दुधिवरे खिंडीतील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पाणी साठणाऱ्या भागात काँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण करण्यात येणार होते. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असताना अद्याप दुधिवरे खिंडीतील रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांसह पर्यटकांनी केल्या आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या भागातील ग्रामस्थांसह पर्यटकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून वाहने न्यावी लागत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dudhiware khind road in lonavala in worse condition zws
First published on: 25-05-2022 at 00:01 IST