वारजे जलकेंद्राअंतर्गत चांदणी चौक आणि अन्य टाकी परिसरात , तसेच पर्वती, होळकर जलकेंद्र, चतु:श्रृंगी टाकी येथे तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील पंपिंग यंत्रणा बंद ठेवली जाणार असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (७ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे-
चांदणी चौक टाकी परिसर- पाषाण, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन परिसर, उजवी भुसारी काॅलनी, डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरज नगर, सागर काॅलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीजवळील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा परिसर, मोहननगर, सूस रस्ता

गांधीभवन टाकी- कुंभारवाडी परिसर, काकडे सिटी, होम काॅलनी, सिल्पा फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू गार्डन सिटी, पाॅप्युलर काॅलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा साेसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य काॅलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोासयटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थ वेद, कांचनगंगा, अलकनंदा, श्राणवधारा झोपडपट्टी परिसर, सहजानंद, गांधी स्मारक, मुंबई-पुणे बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही बाजू, हिंगणे होम काॅलनी, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर

हेही वाचा >>> पुण्यातील स्वच्छ संस्थेची ‘व्ही-कलेक्ट’ मोहीम

जीएसआर टाकी परिसर – कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी,शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

एस.एन.डी.टी. टाकी परिसर- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, एसएनडीटी परिसर, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.
नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र पंपिंग – मुळा रोड, खडकी कँन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हरीगंगा सोसायटी.

हेही वाचा >>> प्रादेशिक पक्ष संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव ; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

चतुश्रुंगी टाकी परिसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.

पर्वती टाकी परिसर – सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to repair work pune municipal corporation has decided to stop water supply on thursday pune print news amy
First published on: 04-10-2022 at 14:31 IST