Premium

पुणे शहराला बुधवारी सकाळी पडला होता धुक्याचा वेढा

मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले.

unseasonal rain temperature dropped fog pune Wednesday morning pune
पुणे शहराला बुधवारी सकाळी पडला होता धुक्याचा वेढा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पुणे: शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. मात्र त्यानंतर शहरातील तापमानात घट होऊन बुधवारी सकाळी शहरात धुके पसरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीचा कालावधी आणि त्यानंतरचे काही दिवस शहरात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. फटाके, बांधकामे आणि अन्य कारणांनी हवेची गुणवत्ता खालावून ती अतिवाईट श्रेणीपर्यंत घसरली होती. मात्र त्यानंतर आता शहरातील हवेची गुणवत्ता सुधारून सामान्य स्थितीवर आली आहे. त्याशिवाय हवेत सुखद गारवा निर्माण झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. सायंकाळपासूनच हवेत गारवा जाणवू लागला आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड मधील प्रदूषण घटले, धुलिकणांचे प्रमाण किती?

या पार्श्वभूमीवर बुधवारची सकाळ धुक्याच्या दुलईत उजाडली. शहराच्या विविध भागांमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र होते. मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले. सकाळीच व्यायामासाठी फिरायला बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या धुक्याचा अनुभव घेता आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to unseasonal rain temperature dropped and there was fog in pune on wednesday morning pune print news ccp 14 dvr

First published on: 29-11-2023 at 16:57 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा