scorecardresearch

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळणार विनामूल्य औषधोपचार

गणेशोत्सवादरम्यान महापालिकेच्या अंतर्गत सर्व दवाखाने आणि रुग्णालयामध्ये विनामूल्य औषधोपचार दिले जाणार आहेत.

free medication during ganeshotsav
आरोग्य विभागाकडून चार फिरत्या दवाखान्यांची सुविधा देण्यात आली असून ही सेवा विसर्जन मार्गावर राहणार आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषधोपचार व्यवस्था, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवरील कर्मचारी व्यवस्थापन, जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच उत्सवाच्या काळात जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांची गळती रोखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान महापालिकेच्या अंतर्गत सर्व दवाखाने आणि रुग्णालयामध्ये विनामूल्य औषधोपचार दिले जाणार आहेत.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

गणेशोत्सवास आज सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व १५ क्षेत्रीय कार्यालये, अग्निशमन दल, विद्युत विभाग आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच फिरती स्वच्छतागृहेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

आणखी वाचा-Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील फूलबाजार बहरला!

क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर मिरवणूक मार्गावर स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. औषधोपचारांची व्यवस्थाही करण्यात आली असून कंटेनर, निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विसर्जन घाटांवर औषध फवारणी करण्यात आली असून नदी किनारच्या घाटांवर विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सुविधा देण्यात आली आहेत. विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा ठिकठिकाणी बसविण्यात आली आहे.

फिरते दवाखाने

आरोग्य विभागाकडून चार फिरत्या दवाखान्यांची सुविधा देण्यात आली असून ही सेवा विसर्जन मार्गावर राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये फिरत्या दवाखान्यांबरोबरच १०८ रुग्णवाहिकेची सुविधाही आहे. गणेशोत्सवाच्या कालावाधीत सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधोपचार आरोग्य विभागाकडून दिले जाणार आहेत.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

विसर्जन घाटांवर जीवरक्षक

विसर्जनासाठी अस्तित्वातील हौदांची दुरुस्ती करण्यात आली असून, रंगकाम पूर्ण झाले आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. विसर्जन घाटांवर अग्निशमन दल आणि जीवरक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मुकादम, विद्युत विभागातील कर्मचारी यांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गणेश मूर्ती संकलन आणि दान केंद्रांची व्यवस्थाही क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आली आहे. नदी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी धोका नियंत्रक कठडे उभारण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाकडून १८ विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १३० खासगी जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्या जीवरक्षकांना फ्लोरोसेन्ट जॅकेट्स देण्यात आले असून नदी किनारी सुरक्षेच्या दृष्टीने दोरखंड लावण्यात आले आहेत. अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत १५०० मतदारांसाठी होणार एक केंद्र… जाणून घ्या मतदान केंद्रांची रचना

विसर्जन घाट

संगम घाट, वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा, राजाराम पूल, नेने घाट, ओंकारेश्वर घाट, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यालयामागील बाजू, दत्तवाडी घाट, औंधगाव घाट.

आपत्कालीन संपर्क क्रमांक
०२०-२५५-१२६९

०२०-२५५०६८०० (१/२/३/४)
गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ९६८९९३१५११

देवेंद्र पोटफोडे अग्निशमन प्रमुख- ८१०८०७७७७९, ०२०-२६४५१७०७
अग्निशमन दल- १०१

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 11:24 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×