ई-बाईक योजनेतील सर्व सुविधा महापालिकेच्या पदपथांवर

पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित भाडेतत्त्वावरील ई-बाईक योजनेसाठी सायकल योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा वापर होणार आहे. त्यानुसार ई-बाईकची चार्जिग स्टेशन आणि योजनेतील गाडय़ा पदपथांवरच उभ्या राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुविधेसाठी महापालिके कडूनच पदपथांवर अतिक्रमण होणार आहे.

महापालिके च्या मुख्य सभेने भाडेतत्त्वावरील ई-बाईक योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पाचशे ठिकाणी चार्जिग स्टेशन्स उभारण्याचे प्रस्तावित आहे. कं पनीकडून स्टेशन उभारली जाणार असली तरी त्याला महापालिके ची मान्यता घ्यावी लागणार आहे. दोन दुचाकी उभ्या करण्यासाठी ८७ चौरस फूट जागा कं पनीला अपेक्षित असून जागा निश्चितीची प्रक्रिया महापालिके कडून सुरू झाली आहे. मात्र बहुतांश चार्जिग स्टेशन प्रशस्त पदपथांवरच उभी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिके ने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने चार वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर सायकल योजना सुरू के ली. त्याअंतर्गत पदपथांलगत सायकल मार्गाची बांधणी करण्यात आली तसेच सायकल ठेवण्यासाठी स्टॅण्ड बसविण्यात आले. आता सायकल योजना गुंडाळली गेल्याने योजनेअंतर्गत विकसित के लेल्या पायाभूत सुविधा ई-बाईक योजनेसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे पदपथांवर विकसित के लेल्या सायकल मार्गाचा उपयोग योजनेतील गाडय़ा ठेवण्यासाठी के ला जाणार असून पदपथांवरच चार्जिग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

किमान दहा दुचाकी उभ्या करण्यासाठी तसेच अन्य यंत्रणेचा विचार करता एका चार्जिग स्टेशनसाठी ३ हजार ३० चौरस फु टांच्या जागेची आवश्यकता लागणार आहे. चार्जिग स्टेशनसाठी विद्युत पुरवठा आणि अन्य तांत्रिक बाबींच्या पूर्ततेबरोबरच शेडही उभारावे लागणार आहे. चार्जिग स्टेशन किं वा दुचाकी उभ्या करण्याची जागा लांब असल्यास योजनेला प्रतिसादही कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यालगतच किं वा पदपथालगतच ही सुविधा द्यावी लागणार आहे.

अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स अंतर्गत महापालिके ने शहरातील काही रस्ते विकसित के ले आहेत. रस्त्यांलगत प्रशस्त पदपथांची बांधणी करण्यात आली असून त्या लगतच सायकल मार्गही ठेवण्यात आले आहेत. मात्र चार्जिग स्टेशन पदपथांवर किं वा सायकल मार्गावरच उभारावे लागणार असल्याने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महापालिके ला सुधारणा करावी लागणार आहे. पादचाऱ्यांना अडथळामुक्त चालता यावे हा अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्समधील महत्त्वाचा घटक आहे. मात्र त्यालाही यामुळे हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे.

‘रस्त्याची रुंदी १८ मीटरपेक्षा कमी असेल तर चार्जिग स्टेशन उभारणीला मान्यता दिली जाणार नाही. मात्र रस्ते प्रशस्त असतील आणि पादचाऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नसेल तर त्याबाबत विचार के ला जाईल,’ असा दावा महापालिके च्या पथ विभागातील अधिकाऱ्यांनी के ला.

पहिल्या टप्प्यात पाचशे ठिकाणी चार्जिग स्टेशन

अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स अंतर्गत पदपथ, पावसाळी गटारे आणि वाहिन्या, सेवा रस्ते, सायकल मार्ग आणि पार्किं गची उपलब्धता या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्त्यासह अन्य तेरा रस्ते महापालिके ने या पद्धतीने विकसित के ले आहेत. मात्र ई-बाईक योजनेसाठी सुविधा देताना या रस्त्यांवरच अतिक्रमण होणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात पाचशे ठिकाणी चार्जिग स्टेशन उभारण्याचे नियोजित आहे.

योजनेला मान्यता मिळाली असली तरी जागांबाबतचा अभ्यास सुरू आहे. रस्ते प्रशस्त असतील आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत नसेल तर चार्जिग स्टेशन पदपथांवर विकसित के ली जाऊ शकतील. मात्र अद्यापही त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. बालेवाडी भागातून योजनेला प्रारंभ करण्याचे विचाराधीन आहे. सध्या योजनेतील कामांचा आढावा घेतला जात आहे.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका