पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे आणि नगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेस या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर शनिवारी छापे घातले. या कारवाईत १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले असून, ही रक्कम हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ‘ईडी’ने व्यक्त केला आहे. व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलिएट वित्तीय संस्थेचा प्रमुख विनोद खुटे सध्या दुबईत वास्तव्यास आहे. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने खुटे याने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले आहेत. ही रक्कम त्याने हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. खुटे याने गुंतवणूकदारांना त्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘ॲप’चा वापर केला आहे.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

या ॲपचे नाव ‘ग्लोबल ॲफिलेट बिझनेस’ असे आहे. खुटे याने त्याच्या योजनेत अन्य गुंतवणूकदारांना सहभागी करून घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. अशा पद्धतीने त्याने १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. खुटे याच्या विरुद्ध ‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) कायद्यान्वये ईडीने गुन्हा दाखल केला आहे.