पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे आणि नगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेस या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर शनिवारी छापे घातले. या कारवाईत १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले असून, ही रक्कम हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ‘ईडी’ने व्यक्त केला आहे. व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलिएट वित्तीय संस्थेचा प्रमुख विनोद खुटे सध्या दुबईत वास्तव्यास आहे. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने खुटे याने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले आहेत. ही रक्कम त्याने हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. खुटे याने गुंतवणूकदारांना त्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘ॲप’चा वापर केला आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.