पुणे : शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. राजकारणातील आघाड्यांमुळे मंत्री वेगवेगळे होतात; पण माझे गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू. क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे, मंत्रीही एकच असायला हवा. भविष्यात असा निर्णय झाल्यास ते फायदेशीर ठरेल, असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पुण्यात मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रमात केसरकर बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी,  माजी विद्यार्थी ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. के. एच. संचेती, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा : पुणे महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा ; १४ शिक्षकांची नावे जाहीर

तिसरी पासून परीक्षा घेण्याचा विचार

केसरकर म्हणाले, की पहिली, दुसरीपासून परीक्षा न घेता तिसरीपासून परीक्षा घेण्याचा विचार आहे. गृहपाठ बंद करावा असं वाटत नाही. बालवाडीपासून गृहपाठ दिला जातो. गृहपाठ कोणत्या वर्गापासून द्यायचा विचार करायला हवा. गृहपाठ सक्तीचा झाला आहे; पण मुलांनी खेळलेही पाहिजे. मुले शाळेत लिहीत राहतात, घरीही लिहीत राहतात. शिक्षकांची जबाबदारी पुस्तकांपलीकडे आहे. मुलांना शिकवणी लावण्याची वेळ येता कामा नये.आयसीएसई, सीबीएसई शाळा सुरू करण्याचा विचार आहे. मराठी शाळांमध्ये आता इंग्रजीही शिकवले जाते. कुठल्याही शाळेत प्रत्येक शाळेत सक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आता इंग्रजी शिकतो. सर्वोत्कृष्ट शिक्षण मातृभाषेतून मिळते. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education and sports departments under same minister deepak kesarkar girish mahajan pune print news tmb 01
First published on: 07-10-2022 at 14:05 IST