दुबार, स्थलांतरितांची नावे वगळली

पुणे : पुढील वर्षांच्या सुरूवातीला होणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेकडून शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक शाखेकडून दुबार, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणात वगळण्यात आल्याने सन २०१९ च्या विधासभा निवडणुकीनंतर तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत केवळ आठ हजार मतदार वाढले आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर हरकती, दावे नोंदवण्यासह नव्याने मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंत मुदत असून अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही अंतिम यादी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली असून ती यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भाग मिळून एकूण २१ विधानसभा मतदार संघांमध्ये ७८ लाख ९५ हजार ८९४ मतदार झाले आहेत. त्यापैकी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमध्ये ३१ लाख १३ हजार ९१७, िपपरी-चिंचवडमधील तीन मतदार संघांमध्ये १३ लाख ६१ हजार १७५, तर ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदार संघांमध्ये ३४ लाख २० हजार ८०१ मतदार झाले आहेत.

दरम्यान, शहरातील आठ मतदार संघांपैकी सर्वाधिक पाच लाख २४ हजार ३५२ मतदार हडपसरमध्ये असून खडकवासला मतदार संघ मतदार संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  सर्वाधिक कमी म्हणजेच दोन लाख ८१ हजार ८९ मतदार पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात आहेत. जिल्ह्यातील एकू ण २१ विधानसभा मतदार संघांपैकी पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघात पाच लाख ३९ हजार ४९८, भोसरी मतदार संघात चार लाख ६९ हजार ११८, तर पिंपरी मतदार संघात तीन लाख ५२ हजार ५५९ मतदार झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक चार लाख सात हजार ३०९ मतदार शिरूरमध्ये, तर सर्वात कमी दोन लाख ९१ हजार ५१ मतदार आंबेगाव तालुक्यात आहेत. याशिवाय प्रारूप मतदार यादीत एकू ण २१ मतदार संघांमध्ये २४५ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ५ जानेवारीला

निवडणूक शाखेकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे, हे तपासण्यासाठी ठश्रढ.कल्ल किंवा NVSP.In  या उपयोजनवर (अ‍ॅप), किंवा Voters Helpline या निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तपासता येणार आहे. मतदार यादीत नाव नसल्यास ३० नोव्हेंबपर्यंत याच संकेतस्थळांवर अर्ज क्रमांक सहा भरावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे.

शहरातील आठ विधानसभा मतदार संघनिहाय मतदार

मतदार संघ            पूर्वीचे मतदार          नवे मतदार

वडगाव शेरी            ४,६१,९७६             ४,४९,४६५

शिवाजीनगर           ३,०६,४२०             २,९४,९७८

कोथरूड               ४,१३,३८९             ४,१८,६४४

खडकवासला            ४,९५,९७६             ५,११,५५१

पर्वती                 ३,५४,४७१            ३,४९,८४३

हडपसर                 ५,१९,७१७             ५,२४,३५२

पुणे कॅ न्टोन्मेंट      २,९२,९०९             २,८१,०८९

कसबा पेठ             २,९३,२२४             २,८३,९९६