या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लाख’मोलाचे मंत्रिपद गेल्यापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. गेलेले स्थान मिळवण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर त्यांचा संघर्ष सुरू आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘संघर्ष’ यात्रेकरूंचे खडसे यांनी स्वागत केल्याची घटनाही ताजी आहे. या पाश्र्वभूमीवर, िपपरी-चिंचवड शहरातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत तसेच मुख्य कार्यक्रमात खडसे यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काही मंत्री व महत्त्वाचे नेते दुसऱ्या रांगेत होते. मात्र, खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घऊन त्यांना पुढे बसवण्यात आले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेल्या उत्तुंग यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिलेदार असल्याचे सांगून त्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. त्याचा संदर्भ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सायंकाळी चिंचवडच्या सभेत दिला. दानवे कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येत असताना द्रुतगती महामार्गावर त्यांच्या मोटारीला अपघात झाला. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. बैठकीच्या ठिकाणी डॉक्टर बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse pimpri bjp
First published on: 27-04-2017 at 03:57 IST