Premium

मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दिल्लीवारीवर अजित पवारांची टीका; म्हणाले, आमच्यासाठी ज्ञानोबा-तुकोबा..

शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे.

ajit pawar loksatta
(अजित पवार)

पुणे: शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत दिल्ली वारी होत आहे.त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्या दिल्लीवारीचा काही फरक पडतोय का त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, वीस जणांच मंत्रिमंडळ चांगल पद्धतीने काम करू शकत.तसेच महिलांना प्रतिनिधित्व न देणे हे त्यांना योग्य वाटत असेल एवढ्या मोठ्या महिला प्रतिनिधीना अपमानित करणे योग्य वाटत असेल अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टोला लगावला.तसेच ते पुढे म्हणाले की,कोणी गुवाहाटी,सुरत,गोवा वारी करावी किंवा आणखी तिसरी वारी करावी.पण आम्हाला माऊली आणि तुकोबांची वारी निघणार आहे.आमच्या दृष्टीने ती वारी महत्वाची आहे.आम्ही साधू संताचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक आहोत अशा शब्दात पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार वर त्यांनी निशाणा साधला.

ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच मारक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यां बद्दल चांगली बोलण्याची अपेक्षा का करता.आमच्याबद्दल टीकात्मक बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde and devendra fadnavis constant visits to delhi ajit pawar criticism svk 88 amy