वारकऱ्यांच्या भावानांना दुखवून देहू येथे रिंग रोड बांधला जाणार नाही. रिंग रोड उभारताना संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श झालेल्या भंडारा डोंगराला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच देहू येथील तुकोबारायांचे मंदिर जगातील सर्वांत भव्य, दिव्य मंदिर असेल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते आज पुण्यातील देहू (२९ जानेवारी) येथे बोलत होते.
हेही वाचा >>> चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना, भाषणात म्हणाल्या; “जोतिबांचा शोध…”
रिंग रोड ही शहराची गरज असते, पण…
“रस्ते, बायपास रोड, रिंग रोड ही शहराची गरज असते. मात्र येथील भंडारा डोंगराला संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे, असे समजले. याबाबत मी अधिक माहिती घेतली. त्यानंतर या डोंगराला काहीही होता कामा नये. हा रस्ता वळवून उभारा, असे मी सांगितले,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या तुकाराम महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या “आपण…”
“वारकऱ्यांच्या तसेच लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवून विकास करणारे आपण राज्यकर्ते नाहीत. येथे जबरदस्त, भव्य, दिव्य तुकोबारायांचे मंदिर तयार होत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येतील राम मंदिराचे काम होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील अयोध्येत राम मंदिर उभे राहावे, अशी इच्छा होती. तशाच प्रकारचे काम देहू येथे होत आहे. तिकडे श्रीराम मंदिर उभे राहात आहे. तर इकडे तुकोबारायांचे मंदिर उभे राहात आहे. हा दैवी योगायोग आहे,” असेही शिंदे म्हणाले.