पुणे : प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात ‘एल-निनो’ घटक अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू वाढत जाऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र होण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या हवामान विभागाच्या याबाबतच्या अहवालात प्रशांत महासागराच्या पूर्व भागात ‘एल-निनो’ सक्रिय झाल्याचे म्हटले आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू विकसित होऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र होईल, असा अंदाज आहे. हा अंदाज हिवाळय़ापर्यंत असल्यामुळे पुढील स्थितीविषयी भाष्य करण्यात आलेले नाही.

Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

‘एल-निनो’ जुलैपासून सक्रिय होईल आणि त्याचा परिणाम ऑगस्टनंतर म्हणजे मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात दिसेल, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात जूनच्या पहिल्या आठवडय़ातच ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण मोसमी पावसावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने ‘एल-निनो’ विकसित होण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली होती.

वर्षभर प्रभाव..

‘एल-निनो’ २०१६ मध्ये सक्रिय झाला होता. २०१६ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. जगभरात ‘एल-निनो’मुळे दुष्काळ, अतिवृष्टी, तापमानवाढ असे परिणाम आढळतात. यंदाचे वर्षही उष्ण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘एल-निनो’चा प्रभाव जवळपास वर्षभर राहतो.

इतिहासात..

‘एल-निनो’मुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. ‘एल-निनो’ सक्रिय झाला म्हणजे देशात दुष्काळ, असे समीकरण अजिबात नाही. अनेकदा ‘एल-निनो’ सक्रिय असतानाही देशात सरासरीइतका पाऊस झाला आहे. यापूर्वी २००९, २०१४, २०१५ आणि २०१८ मध्ये मोसमी पावसावर ‘एल-निनो’चा प्रभाव झाल्याचे आढळले होते. 

पाऊस २४ तासांत कर्नाटकमध्ये

पुणे : मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. पुढील २४ तासांत मोसमी वारे उर्वरित केरळ आणि तमिळनाडूचा भाग व्यापून कर्नाटक आणि ईशान्येकडील राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला. गुरुवारी केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी दुपापर्यंत आगेकूच केली नव्हती. मात्र, पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती आहे.

परिणाम काय?

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढतो. वाऱ्यांची दिशा बदलते आणि ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. वारे आपल्याबरोबर बाष्पाने भरलेले ढग वाहून नेतात. परिणामी, पूर्वेकडील भागांत अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील म्हणजे दक्षिण, आग्नेय आशियात दुष्काळी स्थिती निर्माण होते.

एल-निनो आता नुकताच  सक्रिय झाला आहे. तो सौम्य आहे. जुलैनंतर त्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे सध्या मोसमी पावसावर फारसा परिणाम होणार नाही. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे जुलैनंतर एल-निनोचा प्रभाव जाणवू शकतो. – डॉ. अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे