scorecardresearch

पुणे : मोफत साडी वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास

आमच्या शेठला मुलगा झाला असून ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे,’ अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली.

पुणे : मोफत साडी वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास
प्रातिनिधिक फोटो- इंडियन एक्स्प्रेस

महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे पावणे तीन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना कसबा पेठेतील लाल महाल चौक परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बुधवार चौकात राहायला आहेत. बुधवारी (७ डिसेंबर) त्या लाल महाल चौकातील श्री दत्त मंदिरात दुपारी तीनच्या सुमारास दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी महिलेला अडवले.

हेही वाचा >>> पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित

‘आमच्या शेठला मुलगा झाला असून ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे,’ अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी पिशवीतील पावणे तीन लाख रुपयांचे दागिने लांबविले. काही वेळानंतर महिलेने पिशवीत उघडून पाहिली. तेव्हा पिशवीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 16:25 IST

संबंधित बातम्या