लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाषाण परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा घराशेजारी राहणाऱ्या इसमाने विनयभंग करत महिलेस शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आदर्श डोग्रा (रा. पुणे) या आरोपीवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

आणखी वाचा- पुणे : टोमण्यांमुळे पत्नीला हदयविकाराचा त्रास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार तीन जानेवारी रोजी घडलेला असून ज्येष्ठ नागरिक महिलेने विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित ७५ वर्षीय महिला आणि आरोपी हे एकमेकांचे घराशेजारी राहण्यास आहेत. घटनेच्या दिवशी आरोपीने विनाकारण महिलेच्या सेफ्टी ग्रील डोअरवर लाथा मारल्याने त्यांनी याबाबत शेजाऱ्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने आक्रमकपणे व निर्लज्जपणे महिलेशी धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली. त्यांचा हात पिरगाळून त्यांचे अंगाशी झटापट करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस भालेराव पुढील तपास करत आहेत.