scorecardresearch

जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला निवडणूक

पुणे जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने होणार आहे.

जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला निवडणूक
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यातील विविध ५१ तालुक्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी १२ ऑगस्टपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने होणार आहे. १८ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून १९ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तालुक्यांचे तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. ग्रामपंचायतींसाठी २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्जाची छाननी २ सप्टेंबर रोजी, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, समर्पित राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव असणार आहेत. जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये जुन्‍नर तालुक्यातील ३८, आंबेगाव तालुक्यातील १८, खेडमधील पाच आणि भोर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या