पुणे : शहरातील विविध प्रकारच्या ८२ व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी ॲड. फत्तेचंद रांका तसेच सचिवपदी ॲड. महेंद्र पितळीया यांची निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापारी महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. देवीदास साळी यांनी काम पाहिले. २०२२ ते २०२५ या कालवधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- ॲड. फत्तेचंद रांका (अध्यक्ष), सूर्यकांत पाठक (उपाध्यक्ष), नितीन काकडे (उपाध्यक्ष), अरविंद कोठारी (उपाध्यक्ष), महेंद्र पितळीया (सचिव), राहुल हजारे (सहसचिव), मिलिंद शालगर (सहसचिव), बाॅबी मैनी (खजिनदार), प्रमोद शहा (सहखजिनदार).

हेही वाचा :पश्चिम पुण्यासह पेठांचा पाणीपुरवठा आज बंद ; उद्या कमी दाबाने पाणी

कार्यकारिणी सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- सुरेखा सांडभोर, सतीशचंद्र रहेजा, मनोज सारडा, मिठालाल जैन, हेमंत शहा, मनीष परदेशी, किशोर ओसवाल, जयंती जैन, कल्पेश शहा, घनश्याम सुराणा, आशिष जैन.

पुणे व्यापारी महासंघाची स्थापना १९९४ मध्ये झाली. आतापर्यंत विक्री कर, मूल्यवर्धित कर तसेच एलबीटी करातील जाचक तरतुदींच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. करोना काळात व्यापाऱ्यांची भूमिका शासनास पटवून देण्याचे काम संघटनेकडून करण्यात आले. व्यापारी, कर्मचाऱ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन वेळोवेळी करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of pune traders federation selected at president adv fattechand ranka mahendra pitalia as secretary pujne print news tmb 01
First published on: 25-08-2022 at 10:55 IST