राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतची प्रक्रिया बुधवारपासून (७ सप्टेंबर) सुरू होत आहे. मतदान २९ जानेवारी २०२३, तर मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पतसंस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणुकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३, तर मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर, १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : लोहगावमध्ये डंपरच्या धडकेत सायकलस्वार शाळकरी मुलीचा मृत्यू

निवडणू‍क कार्यक्रमक पुढीलप्रमाणे

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे – २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत

प्रारूप मतदार यादी तयार करणे – ३ ते ३१ ऑक्टोबर

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी – १४ नोव्हेंबर

प्रारूप मतदार यादीवर हरकती मागवणे – २३ नोव्हेंबरपर्यंत

हरकतींवर निर्णय – २ डिसेंबरपर्यंत आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी – ७ डिसेंबर