जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तसेच निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींच्या ७३१ सदस्य पदांसाठी आणि सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई

निवडणूक कार्यक्रमानुसार ७३१ सदस्यपदासाठी ५०३५ उमेदवारांनी ५०७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ३३ उमेदवारांचे ४८ अर्ज बाद झाले. त्यामुळे ५००४ वैध उमेदवारांचे ५०३० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. १९७१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३०३३ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी १०३५ उमेदवारांनी १०४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती १२ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. ४६३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे,त्यामुळे आता सरपंचपदासाठी ५६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा >>>पुणे : मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन

जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायती, भोरमधील ५४, दौंड आठ, बारामती १३, इंदापूर २६, जुन्नर १७, आंबेगाव २१, खेड २३, शिरूर चार, मावळ नऊ, मुळशी ११ आणि हवेली तालुक्यातील सात अशा १२ तालुक्यांतील एकूण २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elections announced for 221 gram panchayats in district pune print news psg17 amy
First published on: 08-12-2022 at 18:26 IST