scorecardresearch

कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी अकरा दिवस बंद राहणार

कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद ठेवली जाईल.

कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी अकरा दिवस बंद राहणार
कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी अकरा दिवस बंद राहणार (संग्रहित छायाचित्र)

कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभालीचे काम पुणे महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद राहणार आहे.

हेही वाचा- काश्मिरी महिलांच्या बेकरी व्यवसायाला पुणेकरांच्या मार्गदर्शनाची जोड

पुणे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. हे काम २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार असल्याने या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद ठेवली जाईल. तर विद्युतदाहिनी क्रमांक दोन आणि एपीसी सिस्टिमची सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 12:58 IST

संबंधित बातम्या