Electricity theft of 50 lakh units exposed in maharsahtra | Loksatta

राज्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस; महावितरण विभागाच्या मोहिमेला यश

महावितरणतर्फे सध्या थकित वीजबिलांच्या वसुलीबरोबरच वीजचोरी रोखण्यावर भर देण्यात आहे. या अंतर्गत महावितरण विभागाने केवळ तीन महिन्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आणली आह.

राज्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस; महावितरण विभागाच्या मोहिमेला यश
यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब; पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसीला फटका(संग्रहित छायाचित्र)

महाराष्टात वीजचोरी रोखण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीने राज्यभर राबविलेल्या मोहिमेत केवळ तीनच महिन्यांत तब्बल ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली आहे. सर्वसाधारण वीजवापर असलेल्या सुमारे ५० हजार घरांना महिनाभर पुरेल इतकी ही वीज आहे. राज्याच्या प्रत्येक विभागांत सर्वाधिक वीजग‌ळती असलेल्या ठिकाणांना केंद्रीत करून ही वीजचोरी शोधली जात आहे.

हेही वाचा- बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता, दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा

महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून वीज गळती होत असलेल्या फिडरमधून सर्वाधिक वीजगळतीचे फिडर निश्चित करण्यात येत आहेत. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. प्रत्येक विभागात महावितरणचा कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गळती होती. ती वीस टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. तर तीस टक्के ते पन्नास टक्के गळती असलेल्या फीडर्सची गळती पंधरा टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. पहिल्या तीन महिन्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आल्याने मिळालेल्या यशामुळे अधिकारी उत्साहित झाले असून, ही मोहीम उद्दीष्ट गाठेपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा- सीमाभागातील कारवायांविरोधात कोल्हापुरात शनिवारी ‘मविआ’चे धरणे आंदोलन

महावितरणतर्फे सध्या थकित वीजबिलांच्या वसुलीबरोबरच वीजचोरी रोखण्यावर भर देण्यात आहे. त्यादृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अधिक वीजगळती असलेले फीडर्स शोधून त्याबाबतीत कारवाई करण्याचा उपाय त्याचा भाग आहे. केवळ तीन महिन्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा-

अशी शोधली वीजचोरी

महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विभागातील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली आणि त्यानुसार कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 21:46 IST
Next Story
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता, दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा