पुणे : राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून अकरा दिवस उलटून गेले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या नाही. शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रस्ताव देऊन आठ दिवसांनंतर शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नसल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण विभागाकडून मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मे महिन्यातच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासह नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा देण्यात आली. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदवणे आदी प्रक्रिया राबवली जाणार होती. त्यानुसार १७ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रियेची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत मुंबईतील २ लाख ४६ हजार ७४९, पुणे-पिंपरी चिंचवडमधील ८१ हजार ४५२, नागपूरमधील २५ हजार ३९४, नाशिकमधील २२ हजार ३८१,  मात्र शिक्षण विभागाकडून काहीच सूचना दिल्या जात नसल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eleventh admission process tenth verdict students parents concerned ysh
First published on: 29-06-2022 at 00:05 IST