पुणे : खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीने कंपनीतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रारही दिले होती. मात्र, समितीने तरुणीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आरोपी व्यवस्थापकाने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.

याप्रकरणी व्यवस्थापक शुभम दुबे (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम दुबे एका प्रसिद्ध खासगी वित्तीय संस्थेत व्यवस्थापक आहे. येरवडा भागातील आयटी पार्क परिसरात कंपनीचे कार्यालय आहे. तरुणी वित्तीय संस्थेत कर्मचारी आहे. तरुणी प्रसाधनगृहात जाताना दुबे तिचा पाठलाग करायचा. प्रसाधनगृहाजवळ त्याने तरुणीला अडवून असभ्य वर्तन केले. त्याने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली.

Brahmin, Maharashtra assembly elections Brahmin,
विधानसभा निवडणुकीसाठी सकल ब्राह्मण समाजाने घेतला मोठा निर्णय !
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Dispute continues in Chinchwad Bhosari in Mahavikas Aghadi Pune news
चिंचवड, भोसरीमध्ये महाविकास आघाडीत तिढा कायम
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!

हेही वाचा >>>ही कसली सांस्कृतिक राजधानी?

तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर तो तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे तरुणीने वित्तीय संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली. मात्र, समितीने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी दुबेने तरुणीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अखेर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर-पाटील तपास करत आहेत.