पुणे : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावरील पदपथावरील अतिक्रमणे आणि या रस्त्यावरील प्लॉट क्र. ६१४ बी येथील अनधिकृत दुकानांवर कारवाई केली.शहरातील विविध रस्त्यांवरील पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करून ती काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने आणि बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेने गेल्या महिन्यात दोन ते तीन वेळा कारवाई केली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विकास विभाग झोन ६ यांच्या वतीने कारवाई करून येथील अनधिकृत बांधकामे व दुकाने काढून टाकण्यात आली.या कारवाईत कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपेम, उपअभियंता रणजित मुटकुळे, किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता महेश शिंदे, मनोजकुमार मते, सागर शिंदे सहभागी झाले होते.