scorecardresearch

पुण्यात अभियंता तरुणीची आत्महत्या, प्रेमसंबंधातून जीवन संपवले?

ही तरुणी बंगळुरु येथे कामाला होती.

engineer Young Girl, commited suside,Love Relationship
प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा संशय

पुण्यातील कोंढवा येथे अभियंता तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जुही नितीन गांधी असं तरुणीचे नाव आहे. कोंढव्यातील सुमा सिलव्हर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणीने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही तरुणी बंगळुरु येथे कामाला होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील शांतीनगर भागात राहणारी जुही नितीन गांधी वय २३ ही बंगळुरु येथील एका आयटी कंपनीमध्ये कामाला होती. तर ती मागील तीन दिवसापूर्वी बंगळुरु येथून पुण्यात आई वडिलांकडे आली होती. मंगळवारी रात्री  जुही त्याच परिसरात म्हणजे  सिल्वरलाईन या सोसायटीमध्ये राहणाऱ्या  तीन मित्रांना  भेटण्यास गेली होती. या तिघांमध्ये  तिचा एक प्रियकर होता. त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्यावर तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-05-2017 at 12:40 IST