सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरण विषयक वेगळ्या दृष्टिकोनातून समाज जागृती करणारे सुजित पटवर्धन ( वय ७७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अक्षर नंदन शाळेच्या विद्या पटवर्धन या त्यांच्या पत्नी होत. पटवर्धन यांच्या निधनाने पर्यावरणासाठी जागरूक राहून संघर्ष करणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला आहे.

हेही वाचा- पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप रावत यांची फेरनिवड

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

पटवर्धन यांनी १९८२ मध्ये परिसर ही पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणारी संस्था पुणे येथे स्थापन केली. तसेच अक्षर नंदन या उपक्रमशील शाळेचे ते एक संस्थापक होते. नर्मदा बचाओ आंदोलन, लवासा विरोधी आंदोलन तसेच शहरांच्या पर्यावरण केंद्रीत समस्या यामध्ये ते सहभागी होते. नागरिकांच्या मोहिमेद्वारे, समविचारी संस्थांसह सक्रियतेने समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले. औद्योगिक आणि शहरी विकासामुळे पर्यावरणाची हानी आणि नाश होणार नाही याची खात्री करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी कायदेशीर मार्गानेही प्रयत्न केले. लवासाविरोधी लढ्यात आणि खटल्यात ते एक फिर्यादी होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यावरण संरक्षण समिती, महाबळेश्वर आणि पाचगणी येथील बांधकाम परवानग्यांवर देखरेख ठेवणारी उच्च न्यायालय समिती, महाबळेश्वर पाचगणी प्रादेशिक नियोजन मंडळ, पीएमसीची नागरी वारसा समिती (पुणे महानगरपालिका), विकास योजना सुकाणू समिती अशा अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे.

हेही वाचा- तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसह ‘सीडीएस’ यांची ‘एनडीए’त भेट; चौघेही एकाच तुकडीचे स्नातक

पुणे महापालिकेसाठी १९९० च्या दशकाच्या मध्यापासून त्यांनी शाश्वत शहरी वाहतूक धोरणाच्या बाजूने लक्ष केंद्रित केले. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बळकट करावी यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. नुसते रस्ते रुंद करून किंवा उड्डाण पूल बांधून वाहतूक समस्या सुटणार नाही, असे ते आग्रहाने प्रतिपादन करत.

हेही वाचा- सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संगणकप्रणाली; म्हाडाचा उपक्रम

पटवर्धन यांचे शालेय शिक्षण ऋषी व्हॅली येथे झाले. तर, लंडन येथून त्यांनी छपाई बाबतचे उच्च शिक्षण घेतले. छपाई क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. चित्रकार असलेल्या पटवर्धन यांना जाझ संगीताची आवड होती.