अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये भारतीय केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने केला असून, असा करार पहिल्यांदाच करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- गाजावाजा केलेल्या पिंपरीतील वाहनतळ योजनेचा बोजवारा; ठेकेदार कंपनीकडून काढता पाय

सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कसह एकूण पाच सामंजस्य करार

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने नुकतील अमेरिकेतील काही विद्यापीठांना भेट दिली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा या शिष्टमंडळात सहभाग होता. या दौऱ्यावेळी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कसह एकूण पाच सामंजस्य करार करण्यात आले. या करारांद्वारे दुहेरी पदवी अभ्यासक्रम, प्राध्यापक-विद्यार्थी देवाणघेवाण, संशोधन प्रकल्प राबवणे शक्य होईल.

हेही वाचा- भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य, राज्यात कोणाचेही नियंत्रण नसलेले सरकार; जयंत पाटील यांचा आरोप

इतर संलग्न संस्थांसोबतही संबंध प्रस्थापित

सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये भारतीय केंद्राची स्थापना करण्यासाठी केलेल्या कराराच्या माध्यमातून ब्राॅनक्स कम्युनिटी कॉलेज, बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क रिमोट सेन्सिग अर्थ सिस्टीम या संलग्न संस्थांसोबतही संबंध प्रस्थापित झाले. ड्रेक्सेल युनिव्हर्सिटीसह केलेल्या करादाद्वारे जैव विज्ञानशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम अधिक सक्षम करणे, संशोधन संधी उपलब्ध होऊ शकतील. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीसह केलेल्या कराराद्वारे उद्योजकता विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याबरोबरच अन्य तत्सम गोष्टींबाबत काम करता येईल.

हेही वाचा- पुणे : नवरात्रोत्सवात मराठवाडा , मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी ; कोकण , विदर्भात तुरळक ठिकाणीच पाऊस

भविष्यात संशोधन प्रकल्प राबवणे शक्य

अमेरिकेतील विद्यापीठांसह केलेल्या कराराच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थी प्राध्यापक आदानप्रदान, द्विलक्षी अभ्यासक्रम, कार्यशाळा, परिषद, संशोधन प्रकल्प राबवणे शक्य आहे. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला, संगीत, योग आणि आयुर्वेद या गोष्टी शिकण्यात रस आहे. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी संबंधित अभ्यासक्रम सुरू करता येतील, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Establishment of india center at city university of new york pune print news dpj
First published on: 27-09-2022 at 12:44 IST