दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : देशात पिझ्झा, बर्गरसारख्या जंकफूडकडे कल वाढत असताना युरोप, आखाती देशांनी सर्वाधिक पौष्टिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृणधान्यांच्या बियाणांची भारतातून विक्रमी आयात केली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षांत देशातून जगभरातील देशांना ४८० कोटी रुपये किमतीच्या बियाणांची निर्यात करण्यात आली आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश

चालू वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरात तृणधान्यांविषयी जागृती वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरातून ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या बियाणांना मागणी वाढली आहे. विशेषकरून आखाती देश, युरोपीयन देशांनी बियाणांची आयात करून आपापल्या देशांत तृणधान्य उत्पादन करण्याचे धोरण आखले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १०१ कोटी रुपयांच्या तृणधान्यांची निर्यात झाली आहे. पण, एकूण ४८० कोटी रुपये किमतीचे बियाणांची निर्यात झाली आहे. म्हणजे तृणधान्यांच्या निर्यातीपेक्षा बियाणांची निर्यात वाढली आहे. जगभरातील देशांनी तृणधान्ये आयात करण्यापेक्षा आपआपल्या देशात तृणधान्यांचे उत्पादन वाढविण्याचे धोरण आखले आहे.

तृणधान्यांची निर्यात अशी..

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रेट मिलेट, अशी ओळख असलेल्या ज्वारीच्या १०,०९६ टन बियाणांची, तर बाजरीच्या ५२,२६६ टन आणि नाचणीच्या २१,१३० टन बियाणांची निर्यात झाली आहे. राळ, कोद्रा, राजगिरा, वरईसारख्या तृणधान्यांच्या १५५ टन बियाणांची निर्यात झाली आहे. चालू वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.तृणधान्यांचे आहारातील महत्त्व कळल्यामुळे आपल्याच देशात उत्पादन करण्याचे धोरण आखले जात आहे. त्यासाठी थेट तृणधान्यांची आयात न करता बियाणांचीच आयात करण्यावर भर दिला जात आहे. – गोविंद हांडे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग