चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांनी ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज केला आहे. चिंचवड मधून आमदार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे असा सामना रंगला होता. चिंचवडमधून जगताप हे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. यावर आक्षेप घेत राहुल कलाटे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

राहुल कलाटे यांनी काही मुद्दे मांडले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक होत असताना अवघ्या महाराष्ट्रात निवडणूक होत होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात राज्यातील विविध ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे. चिंचवड मधील हजारो मतदार हे त्यांच्या मूळ गावी मतदानासाठी गेले तरी देखील चिंचवड मध्ये मतदानाचा टक्का वाढला कसा? असा प्रश्न राहुल कलाटे यांनी उपस्थित करत आक्षेप घेतला असून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

Due to delayed promotions and lack of qualified officers 4 chairpersons handle 40 297 pending caste certificate cases in 36 districts
जात पडताळणीची ४० हजार प्रकरणे प्रलंबित, केवळ चारच जणांकडे ३६ जिल्ह्यांचा कार्यभार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Hundred more trained traffic servants assist to help traffic department to ease congestion on Ghodbunder road
घोडबंदर भागासाठी मिळणार आणखी शंभर वाहतूकसेवक, ठाणे महापालिका आयुक्तांचे बैठकीत संकेत
Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
7 floor metro station in pune
Video : पुण्यातील हे सात मजली मेट्रो स्टेशन पाहिले का? लोकप्रिय मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ एकदा पाहाच
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा

आणखी वाचा-पुणेकरांसाठी खूशखबर! स्वतंत्र सरकारी कर्करुग्णालय उभे राहणार

एक बूथ साठी जीएसटीसह तब्बल ४७ हजार रुपये मोजले आहेत. अशी एकूण २५ बूथ बाबत त्यांनी पैसे भरले आहेत. अशी माहिती राहुल कलाटे यांनी दिली आहे. अर्ज करून राहुल कलाटे यांना तीन – चार दिवस झाले असले तरी अद्याप तरी निवडणूक आयोग कडून त्यांना उत्तर मिळालेलं नाही. ४५ दिवसात उत्तर मिळणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत.

Story img Loader