राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्र प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच यूडायस प्रणालीत माहिती न जुळणाऱ्या राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

हेही वाचा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात हवी डबल डेकर बस

Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून सीबीएसई शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या संदर्भातील पुण्यातील तीन शाळांची चौकशी करण्यात आली. त्या अनुषंगाने अधिक तपासणी केली असता पुणे परिसरातील अन्य काही शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचे, या प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले.

हेही वाचा- पुणे : प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून ‘आयसर’मधील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राज्यातील ६६६ शाळांची माहिती यूडायस प्रणालीतील माहितीशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांच्या मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे तपासण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’

शाळा मान्यतेचे प्रमाणपत्र दिसेल असे लावणे आवश्यक

शाळांनी त्यांच्या शाळा मान्यतेचा क्रमांक दर्शनी फलकावर स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तसेच शाळा मान्यतेचे प्रमाणपत्र पालकांना दिसेल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल. पालकांनीही पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी शाळा मान्यतेची माहिती तपासून घ्यावी, असे मांढरे यांनी स्पष्ट केले