इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्स संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त २५ ते २७ मे दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे ‘दुर्मिळ व प्रेक्षणीय वस्तूंचे प्रदर्शन’ भरविण्यात येत आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध इंडॉलॉजिस्ट उदयन इंदुरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र टोळे यांनी दिली. या प्रदर्शनात संस्थेच्या सभासदांच्या संग्रहातील काही निवडक दुर्मिळ वस्तूंचे संग्रह प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जुनी वजन मापे, शंख-शिंपले, टोकयंत्रे, विमान मॉडेल्स, टोप्या, गणपती मूर्ती आदी वस्तूंचा समावेश आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत सर्वासाठी विनामूल्य खुले आहे.