scorecardresearch

लोहगाव विमानतळाचाही विस्तार; खासदार गिरीश बापट यांच्याकडून विकासकामांचा आढावा

विमानतळाची जागा बदलून सुपे, बारामती या बाजूला करण्यास हरकत नाही.

Omecron less dangerous than delta

पुणे : विमानतळाची जागा बदलून सुपे, बारामती या बाजूला करण्यास हरकत नाही. मात्र लोहगांव विमानतळाचा विस्तार करून योग्य त्या सुविधा तेथेही दिल्या जातील, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. पुण्यातून विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने होणारी वाढ आणि सध्याच्या इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. ते यावर्षी वापरासाठी खुले होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी विमानतळ प्राधिकरणाला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.

खा. बापट आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची विमानतळ विस्तारीकरणाबाबत नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी विमानतळ विस्तारीकरण तसेच कार्गोसाठी आवश्यक असलेली १३ एकर जागा १ रुपया नाममात्र दराने उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. तसेच विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी  संरक्षण विभागाची २३६० चौरस मीटर जागा देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. विमानतळ विस्तारीकरण, वाहतूक, बहुमजली पार्किंग आदी विकासकामे जलद गतीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्याबाबत बापट यांनी संबंधितांना सूचना केली. तसेच विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी वायुदलाची १३६ एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expansion lohgaon airport review development work by mp girish bapat ysh

ताज्या बातम्या