scorecardresearch

पुणे: देशात तंत्रज्ञान विकासावर खर्च कमी; ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे मत

केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने (एनआरडीसी) आघारकर संशोधन संस्थेत स्थापन केलेल्या लोकसंपर्क केंद्राचे उद्घाटन डॉ. मांडे यांच्या हस्ते झाले.

पुणे: देशात तंत्रज्ञान विकासावर खर्च कमी; ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे मत
‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे( फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस )

तंत्रज्ञानाचे उपयोजन आणि तंत्रज्ञान विकासावर खर्च न होणे या देशातील दोन प्रमुख अडचणी आहेत. संशोधन क्षेत्रात बरेच चांगले काम होत असूनही शास्त्रज्ञांना तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होत नाही, असे स्पष्ट मत भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांनी मंगळवारी मांडले.

हेही वाचा >>>पुणे: झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; मुंढवा भागात अपघात

केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने (एनआरडीसी) आघारकर संशोधन संस्थेत स्थापन केलेल्या लोकसंपर्क केंद्राचे उद्घाटन डॉ. मांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एनआरडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी, संचालक शेखर मुंदडा, आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफालकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: हातगाडीवर पेट्रोल- डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

डॉ. शेखर मांडे म्हणाले, देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि आव्हान द्यायला हवे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञान विकासावर खर्च केला जात नाही. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे यशस्वी उपयोजन व्हायला हवे.संशोधकांना संशोधनासाठी निधी, संशोधनासाठीचे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एनआरडीसी कार्यरत आहे. लोकसंपर्क केंद्राद्वारे संशोधक, अकादमी, स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास पुढाकार घेतला जाईल, असे रस्तोगी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 17:42 IST

संबंधित बातम्या